“असंभव” (एक चित्तथरारक प्रेमकथा) ::=>> भाग- 14


असंभव भाग:=>> 13 पासून पुढे…

*ट्रॅप ब्रेक*

“हेS हाssय!”
“सौम्या!!”
दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली.
“कशी आहेस?”
“मला काय झालंय?.. हेय- रिद्धी!” टाळी देत तिने रिद्धीचा हात हातात घेतला.
“होतात कुठे इतक्या दिवस?”
“विचारु नकोस, अस्सा ताप झालाय ना डोक्याला!..”
“सन्वरी??!!” कोणीतरी मागून हाक मारली आणि सन्वरी मागे वळली.
“हेईईss- सोनी!”
“माय गॉड! कधी- आलीस कधी तू?”
“हे काय, सकाळीच आलेय. दुसरं लेक्चर मिस केल्यावर!”
“ऑSऊss.. ए चल ना बसून बोलूया?” सोनीनं सुचवलं तशा सगळ्याजणींनी कॅन्टीनमधला डावीकडचा एक मोकळा टेबल पकडला. चौघीं चार खुर्च्यां ओढून घेत त्यावर बसल्या.

“ह्ं, बोल काय झालं होतं?” खुर्चीवर बसताच मुळ मुद्द्यावर येत सोनीनं विचारलं
“काही नाही गं, पावसात भिजलो होतो. म्हणून थोडा सीकनेस आला होता हिला” रिद्धी
“पावसात? आणि तुम्ही?- ते कसं काय?”
“जाऊ दे नं! अगोदरच डोकं खराब झालंय” त्या आठवणीने सन्वरी वैतागली
“का?”
“अगं, हिच्या बड्डेच्या दिवशी आम्ही देवदर्शनाला जाणार होतो. मस्तपैकी प्लॅन केलेला. कम्पॅक्ट बेंजपण घेतली होती मी रेंटने. पण ऐनवेळी तिथल्या मवाल्यांनी तमाशा केला आणि आमचा सगळा दिवस खराब करुन टाकला.. स्काउंड्रल्स कुठचे!!” रिद्धी पुटपुटली

“माणसं होती?”
“नाही गं, पोरं होती दोन. आपल्याच एजची असतील”
“यु मीन बॉईज, हं?” एकीकडे सन्वरीकडे बघत सौम्याने भुवया उडवत विचारले “हम्म! हम्म..!”
“स्टुपिड! असं काही नाहीए!” सन्वरीच्या कपाळावर लगेच आठ्या पसरल्या.

“काही नाही? ह्म्मS..! काय बोलत होते ते? लाईन वगैरे मारत होते का- आ!! छेडलं तुला?”
“थोबाड फोडून हातात दिलं नसतं का, छेडलं असतं तर!”
“स्स्..” जणू काही स्वत:च्याच गालावर चपराक बसल्यासारखी सौम्या कळवळली.
“पूअर गाय”
“गाय नाही बैल! आणि दुसरा तो डुक्कर! एक दिवस भेटू दे गं- अस्सा धडा शिकविन मुर्खांना कि, जन्मात कधी विसरणार नाहीत!”
“ए अगं, काय विषय काढताय? जाऊ दे ना, सगळी मुलं तशीच असतात, लाळघोटी कुठली!”

सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावत सोनीला अनुमोदन दिलं. सौम्याने मात्र न पाहिलेल्या त्या मुलांबद्दल विचार करत नुसताच एक दिर्घ उसासा घेतला. इतक्यात समोरुन शेखर येताना दिसला आणि घेतलेला श्वास परत गाडीच्या पंक्चरसारखा फुस्स् करत बाहेर पडला! तिच्या तशा एक्सप्रेशनने सगळ्यांच्या नजरा अगोदर तिच्याकडे- मग कॅंटीनच्या दरवाजाकडे वळल्या. शेखरला बघताच मात्र सगळ्यांच्याच चेहर्‍यावर सुतकी अवकळा पसरली!
“हाय गर्ल्स” अत्यानंदाने हाक मारत त्याने हात केला. सगळ्यांनी त्यावर नुसताच मेंगळट हात वर केला.
“हेय!”
“आला फुकट्या!” सन्वरी तोंडातल्या तोंडात पुटपुटली
“अं? काही म्हणालीस?”
“च्यक्!” हसून तिने नकारार्थी मान डोलावली “कसा आहेस?”
“आय’म डाईंग हंग्री! काही मागवणार आहात का?” मोकळ्या टेबलावरनं नजर फिरवत त्यानं विचारलं.
त्याच्या त्या आगाऊपणाला बघून सन्वरीला राग येऊ लागला. पण तो न दाखवता तिने दात विचकत त्याला खाण्याची अ‍ॅक्शन करत विचारलं

“शेखर.. तुला ह्याच्या- शिवाय काही सुचतच नाही का?”
“नाही गं. सुचत नाही आणि काही जमतही नाही. पण एकदा खाल्यावर बघ काहीही करु शकेन मी”
“एक मेहेरबानी करशील? त्या बाजूच्या टेबलावर बस हं”
“का?- डोंट वरी. मी फक्त खाईन. तुमच्यामध्ये काही बोलणार नाही”

सन्वरीने रागाने रिद्धीकडे दृष्टीक्षेप टाकला. रिद्धीने फक्त हाताने तिला ‘शांत रहा’ म्हणून खुणावले.
‘जर का हा बोलला तर माझ्या हातून मरेल’ अशा अर्थाने सन्वरीने तिला खुणावले. रिद्धीने हसून तिच्या खांद्यावर थोपटले अन ती कँटीन काऊंटरकच्या दिशेनं गेली. सौम्या तिच्या मदतीला गेली. शेखरसाठी एक ग्रिल्ड सँडविच, बाकिच्यांसाठी फ्रेंच फाईज, पकोडे, वेफर्स, कॉफी, टी असं बरंच काही घेत दोघी ट्रे न मग्ज संभाळत आपल्या टेबलाजवळ आल्या.
“हे तुझं वेज् सँडविच. ही तुझी कॉफी… ए तुला टी ना?..”
“रिद्धी…” मध्येच कोणीतरी पुढे येता येता मागे दचकत थांबलं आणि रिद्धीनं मागे वळून बघितलं, तर डोळ्यांवरचा चश्मा सावरत रेनी उभी.

“काय गं, काय झालं?”
“आय नीड सम रेफरन्स बुक्स, तुझं लायब्रेरी कार्ड आहे न? प्लीज दे नं”
“अ-ओ!” तिने आपले दोन्ही एन्गेज्ड हात दाखवले. “ओके जस्ट वन्स सेक..” म्हणत तिने आपली हिप् तिच्या दिशेला फिरवली. टेक इट.. फ्रॉम माय लेफ्टन् साईड”
रेनीने तिच्या हिप पॉकेटमध्ये हात घालत लाइब्रेरि कार्ड काढलं.

“ओके?”
“थँक्यु!” कार्ड मिळताच ती खुश झाली.
“विल यु जॉईन अस?” फ्रँचीजचा एक बाईट घेत सन्वरीनं विचारलं.
“नो थँक्स” म्हणत तिने शेखरकडे बघितलं. तो आपल्याच नादात चाखत-माखत सँडविच खात होता. ती बघतीयसं लक्षात येताच त्याने तिच्याकडे नजर टाकली.

“ह्म्म?” तिला सँडविच खायचं आहे असं वाटून त्याने ‘खाणार का’ म्हणून इशारा केला. तिनं मानेनेच नाही म्हणून सांगितलं. पुन्हा ती आशेनं त्याच्याकडे बघायला लागली!

“ओह्! सॉरी-सॉरी-सॉरी…” तिला काय हवंय ते लक्षात येताच त्यानं गडबडीनं आपली बोटं- वर पासून खालपर्यंत चाटून-पूसून साफ केली. ते बघूनच इकडे चौघींची तोंड वेडीवाकडी झाली.

“घे” चिमटीनं वरच्या खिशातलं लायब्रेरी कार्ड काढत त्यानं ते पुढे केलं.
“तुमची सिग्नेचर्स लागतील”
“डोन्ट वरी. तू पुढे हो, आम्ही येतो” रिद्धी
सगळ्यांचा निरोप घेऊन रेनी लाइब्रेरिच्या दिशेनं गेली.

“सन्वरी, दिस् इज नॉट फेअर हॉ!” ती जाताच सौम्या आपली नाराजी व्यक्त करत बोलली. “यावेळची बर्थडेची पार्टीही दिली नाहीस तू? सांगितलंही नाहीस काही. आणि दोघी एकट्याच चालला होतात. आय मीन- हाऊ कुल्ड यु डू दॅट?”
“काही करायची इच्छाच नाही माझी आता. आणि त्या दिवसामुळे तर नाहीच नाही”
“व्हॉट?? अशी कशी इच्छा नाही?” सोनी
“ए, ते काही नाही,हं. वी वाँट पार्टी- दॅट्स इट!” सौम्या
“येस, अ‍ॅन्ड डोंट ट्राय टू रिफ्युज इट!” सोनीनं बजावलं.
“अरे यार..”
“कमॉन सन्वरी” शेखर
“ए तू गपे!!”
“काहीही झालं तरी आम्हाला पार्टी हवीय, पैसे वाटलंस तर मी देते!”

सन्वरीनं तोंडाचा चंबू करुन सौम्याकडे भुवया उंचावत बघितलं.
“आय मीन.. लेटर ऑन, वी विल स्प्लिट ना..” ती सावरत उद्गरली. तसे सगळेजण हसायला लागले.

“सन्वरी- डोन्ट बी शाईन यार..”
“रिद्धी-?”
“आय थिंक..” कॉफिचा एक घोट घेत रिद्धी बोलली “सगळेजण बरोबर बोलतायत! यू शुल्ड मुव्ह ऑन नाऊ. आय मीन.. या!..
त्या दिवसाचं काय एवढं घेऊन बसायचं? किक ऑन दॅट, बास्टर्डस्. व्हाय यू स्पॉईल युवर मूड?”

“राईट” सोनीनंही लगेच सन्वरीला चुटकी वाजवून दाखवलं.
“हॅss..!! काय राईट?.. इतके दिवस झालेत. एवढ्या उशीरा कोण बर्थडे करतं होय! आणि आत्ता कसली पार्टी हवीय गं तुम्हाला? जा!! मी नाही देत कसली पार्टी-बिर्टी!”
“व्हॉट?” भप्पकन ऑफ होत सोनी उद्गरली.
“ए असं काय गं?”
“असंच!” तिही हट्टाला पेटली.
“माझा मुडही नसल्यावर मी कशाला देऊ पार्टी? गरज आहे क्..” सौम्याने पुढचं ऐकणंच सोडून दिलं. सरळ ओरडत ती दणादण टेबल वाजवायला लागली. सोनीही तिला साथ देत जोरात टेबलावर हात आपटायला लागली…
“आssss…. आsss..!!” दोघींनी टेबल बडवत एकच गलका केला. शेखर सँडविच खात एका हाताने ठेका देऊ लागला.
“एई.. अगं एS.. वेड्या झालात का…”
“ब्लाs ब्लाss ब्लाsss.आssss… वि’आर डिफ्.. वि’आर नॉट लिसटनींग एनिथिंग…!!
वि वाँट पाsर्टी.. पार्टी पार्टी पाsर्टी!
वी वाँट पाsर्टी!.. पार्टी पार्टी पाsर्टी..!!!”
“ए चूप!!…” आवाज चढला तसं सन्वरी कानावर हात दाबत ओरडली. पण कोणीही ऐकेना, तसं तिनं सरळ हात वर केले..
“ओके-ओके स्टॉप! आय’इल् गिव्ह यू” चौघांचे चेहरे एकदम खुलले.
“योS..हूssss…..” ओरडत सगळ्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
“देन- व्हेन टू गो?”
“नॉट व्हेन. दिस् टाईम व्हेअर टू गो!” गालात जीभ घोळवत सौम्या म्हणाली
“फाईन! कुठे जायचंय?”
“आऊट ऑफ एरिया नाऊ! सारखं इथे बोअर झालंय”
“बांद्रा?” सोनी
“रोयाल्टी क्लब!”
“एलेव्हन्थ ओ क्लॉक?”
“शार्प”
“डन”
“डन!”
“ए पण इन्ट्री पास?” सौम्या
“डोन्ट वरी- आय’एल मॅनेज” रिद्धी
“ए व्हॉट अबाऊट मी? आय अल्सो वाँटेड टू कम विथ यू हं”
उरलेला सँडविच तसाच तोंडत कोंबत शेखर गडबडीत उद्गरला
“अ…!! नॉट अ‘गेSन!” सन्वरीनं डोकं पकडत टेबलावर आदळून घेतलं.
“शुअर, त्याशिवाय आम्हाला तरी ते कसं पचेल? सी यु अ‍ॅट एलेव्हन ओ क्लॉक गर्ल्स” हसत रिद्धी पाण्याची बाटली आणायला गेली. त्यावेळी सोनी फेसबुकवर आपलं नोटीफिकेशन चेक करत होती…
“ए वॉव!.. टीटी गॉट बॉयफ्रेंड हा! लकी गर्ल…” मोबाईलमध्ये बघत ती पुटपुटली
=========0=========0=========0=========0=========0=========0=====

“सौम्या.. सोनी.. रिद्धी.. शेखर.. अ‍ॅन्ड अफकोर्स… टुडेज क्युटी क्वीन, बर्थडे गर्ल- सन्वरी!”
हॉलमधल्या डिजेच्या आवाजावर वरताण आवाज चढवत त्रिष्णानं ओरडून सांगितलं.
“हिचाच आज बर्थडे आहे”
“सिप्ली मार्व्हलस्…”
“व्हॉट?” सन्वरी
“हॅप्पी बर्थडे टू यू..” तिच्या पुढे केलेल्या कानाजवळ तोंड आणत तो मोठ्याने बोलला.
“थँक्यु”
“अ‍ॅन्ड गर्ल्स दिस् इज विरेन”
आपापले ग्लास हवेत उंचावर सगळ्यांनी त्याचे स्वागत केले. पार्टीला सुरवात झाली. इतक्यात सोनीनं एका घोटात शॉट संपवला आणि ती थिरकत डान्स फ्लोअरवर जायला लागली. पाठोपाठ सौम्यालाही तिने हात धरुन सोबत नेले.
“विल यू जॉईन?” रिद्धी
“ओह- या, शुअर!” म्हणत विरेनने पटकन शॉट संपवला आणि त्रिष्णाबरोबर डान्स फ्लोअरवर उतरला.

रिद्धी, सन्वरी, आणि शेखर एक-एक शॉट मारत त्यांच्या मागोमाग आले. मध्येच गाणं शफल्ड झालं, म्युजिकचा र्‍हीदम पकडत क्लासी रिमेक गाणं वाजु लागलं. त्याबरोबर दण्-दण्-दण् बास वाजायला लागला. छातीची स्पंदनं वाढली. रक्त सळाळलं. आवडतं गाणं ऐकून सगळ्यांनीच चित्कार काढला. नवीन गाण्याच्या चालीवर पाय पडू लागले. मारलेल्या शॉटने डोक्याला मस्त झिंग आणली होती. मेंदू रिलॅक्सड झाला होता. अगदी सहज मोकळ्यापणाने शरीर झुलत होतं. सोनीनं हेअर बँड हिसकावून काढला. सुळ्ळकन केसं तिच्या खांद्या-तोंडावर घरंगळली. तिचं अनुकरण करत रिद्धीनही केसं सोडली मग त्रिष्णा- सन्वरी, सर्वांनीच केसांना मोकळं केलं. एकच धिंगाणा वाढला. बेधुंदपणे सगळ्याजणी हवेत केसं उडवत नाचू लागल्या. शेखर करंट लागल्यासारखा अंग हलवू लागला. यावेळी त्रिष्णाबरोबर नाचणारा विरेन मात्र राहून-राहून सतत सन्वरीकडे बघत होता!

डान्स- ड्रिंक्स- म्युझिक- मस्ती, बस्स!
सलग साडे तीन तास त्यांचा धिंगाणा चालू होता. एकावर एक सरशी करत होते. पिण्याच्या आणि नाचण्याच्या बाबतीत.
पिण्याचे तर सहा राऊंड झाले. स्वत: एकदा विरेनने सगळ्यांना ड्रिंक्स सर्व्ह केलं. मग मात्र ड्रिंक्सची नशा मेंदूत भिनायला लागली. डोकं सुन्न व्हायला लागलं. हँगओव्हर झाला. सगळ्यात जास्त डेलिकेट हालत होती ती त्रिष्णाची. बसल्या खुर्चीवरच ती हातवारे करत नाचायला लागली होती. मध्येच जोर-जोरात हसत होती. काहीबाही बरळत होती आणि विरेनला लाडाने ‘लव्ह यू जानू.. बेब्बी.. शोणा..’ म्हणत फ्लाईंग किस देत सुटली होती. तिच्या जोडीला सौम्याही टाळी देत खिदळत होती. इकडे शेखर ड्रिंक्स पिऊन-पिऊन पेंगळून बाजुच्या एका मुलीच्या पाठीवर आरामात विसावला होता. त्यांची हालत बघून सोनीनं पार्टी क्विट करण्याचं ठरवलं. त्यातल्या त्यात विरेन शुद्धीवर होता. रिद्धीला इतका हँगओव्हर झाला नसला तरी तिची जिभ बोलताना काहीशी अडखळायला लागली होती. पापण्या जडावल्या होत्या.
“व्-विरेन.. गाडी आहे न्?”
तिने विरेनला साईडला घेत विचारलं.
“टू व्हीलर आहे”
“ओ नो- मग.. त्रिष्णा तुझ्याबरोबर जाऊ शकत नाही, शी.. क्कान्ट सीट् बॅक टू यू”
“देन?..”
रिद्धी विचारात पडली. कारमध्ये फक्त चारच जण बसू शकत होते. जास्तीत जास्त पाच- तेही दाटीवाटीनं! कारण शेखरच दोन माणसांची जागा घेणार होता. येताना सौम्या रिक्षानं आली होती, म्हणून काही वाटलं नव्हतं, पण आता? त्यातल्या दोघांना जरी टॅक्सीनं पाठवायचं बोललं तरी ते शक्य नव्हतं. इतक्या रात्री थेट कुलाब्याकडे जायला अशी टॅक्सी मिळणं अवघड होतं. त्यातही एक एकीकडे राहत होती तर दुसरी दुसरीकडे! टॅक्सीवाला थोडीच असा मध्यरात्रीचा फिरत बसणार होता? आणि आला तरी त्याच्या मागोमाग यांनाही कार घेऊन फिरावं लागलं असतं. कारण एकही धड शुद्धीवर नव्हतं. सोनीच तेवढी ठिकठाक होती.
“मग सोनीला सोडू का- इफ शी डोन्ट माईंड?”
“नको. सोनी माझ्या मदतीला लागेल. इन दिस् कंडीशन.. आय कान्ट ड्राईव्ह प्रॉपर्ली”
“ओके मग मी आज रात्री इथेच बाईक ठेवतो आणि यातल्या दोघांना टॅक्सीतून घरी सोडतो”
“इथं टॅक्सी भेटणं अवघड आहे”
“रिक्षानं सोडतो”
“तू कुठे राहतोस?”
“कलबादेवीला”
“अह्ं- मग ते तुला खुप फिरुन पडेल आणि तुला घरी जायलाही उशीर होईल.. हा! त्यापेक्षा आपण असं करू- मी, सोनी, त्रिष्णा, आणि शेखर कारमधून जातो. तू फक्त सन्वरीला घेऊन तेवढं फ्लोरा फाऊंटनजवळ थांब. सौम्या आणि त्रिष्णाला घरी सोडून आम्ही तिथेच तुला भेटतो”
“सौम्या कुठं राहते?”
“फोर्टजवळ”
“ओके फाईन” विरेनने खांदे उडवले.
मग तिघांना धरुन कारमध्ये बसवण्यात त्याने रिद्धी अन सोनीला मदत केली. सगळी नीट बसल्यावर रिद्धी कारमध्ये येऊन बसली.
सोनीनं कार स्टार्ट केली. क्षणात गाडी टेल लाईटीच्या लालभडक प्रकाशाने उजळून निघाली.
“विरेन- बी केअरफुल हं- शी अल्सो नॉट इन गुड कंडीशन” जाता-जाता ड्रायव्हींग सिटच्या पलिकडून वाकत रिद्धी म्हणाली.
“या, आय’इल् टेक केअर अबाऊट हर”
“ओके, सी यू देन”

हळूवारपणे कार रस्त्यावरुन धावायला लागली… दूर जाणार्‍या त्या कारकडे बघत असताना विरेनला अगदी मोकळं-मोकळं झाल्यासारखं वाटत होतं.. अंधार्‍या निर्मनुष्य जागी पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यासारखे त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या होत्या…
“निघूया?”
धुंदावल्या स्वरात मागून सन्वरीचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहीलं..
झिंगलेल्या नजरेने तोल सांभाळत सन्वरी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघत होती…..
=========0=========0=========0=========0=========0=========0=====

फाऊंटन इन्नच्या थोडं अलिकडेच त्याने गल्लीच्या कोपर्‍यावर बाईक थांबवली अन सन्वरीच्या पेंगुळल्या नजरेत आश्चर्य उमटले.
“व्हाय यू स्टॉप्?”
तिनं काहीशा कुरकुरत्या आवाजात विचारले.
“जाताना तरी ह्या क्युटी पायला एकदा मन भरुन बघून घ्यावं म्हणून थांबलोय”
“ह्म?”
कष्टाने जड भुवया उंचावत सन्वरीने त्याच्याकडे बघितलं. हसली.
“रिअली! कोणीही तुला असं बघायची संधी सोडणार नाही” म्हणताना त्याची नजर तिच्या छातीवरुन फिरत होती “डू यू नो दॅट?”
“ह्म ह्म!.. अंधारात?”
“चंद्राची रंगत रात्रीच चढते, अन तुझी नशाही!”
सन्वरी खुश होत खदखदली, मागे भिंतीला टेकून ती मान तिरपी करत विरेनला बघू लागली.
“थॅन्-क्यू..!!”
“हॅड यू डेट एनिवन?” म्हणत त्याने खांद्यावर हात ठेवत तसाच वर नेला
“नोव्..”
“इतकी सुंदर मुलगी आणि तिला कोणी डेटवर नेली नाही? हाऊ कुल्ड इट बी पॉसिबल- हं?” केसांबरोबर खेळत त्याने तिच्या गोर्‍या गुळगुळीत गळ्याखालच्या उघड्या जागेवरुन अंगठा कुरवाळायला सुरवात केली.
“ह्म्म?- काय करतोयस?”
त्याच्या हाताने गुदगुल्या होऊन तिने अंग आकसून घेतलं.
“प्लिज स्टॉप इट”
डोळ्यांवर आडवा हात धरत ती तक्रारीच्या सुरात उद्गरली. मोबाईलच्या फ्लॅशलाईटने तिला आता त्रास व्हायला लागला होता. तरीही तो तिचा व्हीडीओ शुट करत राहिला. तसं मात्र तिने त्याच्या हाताला झटका देत कॅमेरा खाली केला-

“आय सेड् नोव..!”
“ऑल राईट बेबी.. ” शुट थांबवत त्याने मोबाईल बंद करुन खिशात घातला.
मग चेहर्‍यावर धरलेले तिचे हात खाली करत त्याने हळूवारपणे- मांड्यांपर्यंत लोळणारं तिचं श्रग खांद्यावरुन खाली केलं.
“हुं..”
तिने विरोध दर्शवत श्रग ओढून नीट करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडे लक्ष न देता त्याने सरळ टॅन्क टॉपचे दोन्ही पट्टे झटक्यात खाली ओढले. तिच्या त्या अनावृत्त मांसल गोर्‍या छातीच्या उभारांनी त्याच्या नसानं नसा पेटून उठल्या. हात शिवशिवू लागले. घिसाडघाईने तो नुसत्या उभारावर टीकलेला तिचा टॉप खाली करणार तोच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली!

“हॅलो”
“व्हीडीओ नाही बनवणार? कि फक्त कपडेच काढणार?”
“कोण बोलतंय?”
“मला वाटलं होतं लॉजवर जाऊन तू हे सगळं करशील; पण तू तर महानालायक निघालास रे- रस्त्यावरच?”
“ए भोXXX कोण आहेस रे तू?”
“तुझा बाप! माXX XX खुप हौस आहे ना हे असलं करायची? आता तुझापण एक न एक कपडा याच चौकात निघतोय कि नाही बघ…”
पटकन् त्याने फोन कट केला. आपल्या आजूबाजूला नजर फिरवली. रस्त्यावर चिटपाखरुही दिसत नव्हतं. घाम पुसत त्याने मागे नजर टाकली. सन्वरीवर डोसचा योग्य तो परिणाम व्हायला लागला होता. ती अर्धवट झोपेच्या तंद्रीत गेली होती. गडबडीत त्याने घड्याळ बघितलं आणि लगेच एक फोन लावला-

“हॅलो-”
“हॅलो- कोण बोलतंय? त्रिष्णा आत्ता झोपलेय..”
“रिद्धी- म्.. मी विरेन-”
“विरेन? काय रे, पोहोचलास तू फ्लोरा फाऊंटनजवळ?”
“रिद्धी, ऐक- प्रॉब्लेम झालाय”
“का? काय झालं?” त्याचा घाबरा आवाज ऐकून रिद्धी सावध झाली.
“फ्लोरा फाऊंटनकडे जाताना रस्त्यात आम्हाला एका टपोरी टोळक्यानं अडवलं. सन्वरीला त्यांनी छेडायला सुरवात केली. मी त्यांना हटकलं पण ते इरेलाच पेटले. सिच्युएशन आणखीनच चिघळली. मी कसंतरी तिथून निसटलो पण..”
“पण काय?” रिद्धीचा हँगओव्हर खाड्कन उतरला
“ते आमच्या मागे लागलेत!”
“ओ गॉड- आहेस कुठे तू आता?”
“फाऊंटन इन्नच्या कोपर्‍यावरच अंधारात लपून बसलोय. संधी भेटताच इथून पळून जाईन”
“नो.. विरेन. कुठेही जाऊ नकोस, तिथंच थांब. मी पाच मिनिटांत येते”
“त्.. तू?!!!.. नको-नको, तू इकडे येऊ नकोस. ते सात जण आहेत. आपण काही करु शकणार नाही. त्यापेक्षा मी सन्वरीला घेऊन इथेच एखाद्या हॉटेलवर थांबतो. तूही सगळ्यांना घरी सोडून सरळ घरीच जा. सकाळ झाल्यावर आपण मग…”

“विरेन… मी काय बोलतेय??.. त्रिष्णाला सोडून मी पाच मिनिटांत येतेय, कुठेच जाऊ नकोस!!”
“हॅलो.. रिद्धी…. हॅलो- हॅलो…”
रिद्धीने फोन केव्हाच कट केला होता. तिच्या आगाऊपणाचा क्षणभर विरेनला राग आला.

“श्यॅ!” रागाने मोबाईल खिशात कोंबत तो धावत सन्वरीजवळ आला. सरळ हिसका देऊन तिला पाठमोरी करत त्याने तिच्या श्रगच्या अक्षरश: टराटर फाडून चिंध्या केल्या. हाताजवळची एक किनार पकडत खालपर्यंत टर्रकन टॉप टरकावला. त्यामुळे सन्वरीची गोरीपान पाठ उघडी पडली. आतल्या काळ्याभोर ब्राचा हुक दिसायला लागला. पुन्हा सरळ करत त्याने दंडावर ओघळलेल्या तिच्या टॉपचा उजव्या बाजुचा पट्टा तट्कन् खेचून तोडून टाकला आणि.. त्याचवेळी कळवळून नाक दाबत तो मागे धडपडला!

नाकाचा घोळणा संभाळत असताना त्याच्या दोन्ही बरकडीत एकामागून-एक, अशा दोन-तीन बुक्क्या बसल्या. वेदनेनं विव्हळत तो गुडघ्यावर बसला आणि सावरण्याचीही संधी न देता थाडकन् पुन्हा त्याच्या तोंडावर एक सणसणीत लाथ बसली! क्षणात विरेन हवेत उडत गेला. दण्णकन रस्त्याच्या मधोमध फरफटत जाऊन पडला. ती संधी साधून एकाने धावत जाऊन त्याचे दोन्ही हात पिरगाळत मागे खेचले. दुसर्‍याने ताबडतोब एक रबरी बॉल त्याच्या तोंडात सारला- वरून आपल्या खिशातला रुमाल काढून करकचून बांधला. मग नायलॉनची सेल्फ लॉक स्ट्रीप्स त्याच्या पायाभोवती गुंडाळली. खस्सकन ओढून ती लॉक केली. त्याप्रमाणे हातही जखडून टाकले.
अवघ्या काही सेकंदातच विरेन पूर्णपणे जायबंदी झाला होता!

समोर बाईकच्या बाजुला पाय मुडपून बसलेली सन्वरी डोळे नीट करत समोरच्या दोघांकडे न्याहाळून बघत होती. तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य मिश्रीत प्रश्नचिन्ह उमटले होते. काय चाललंय हे तिला समजत नव्हते. ती निरखून बघण्याचा प्रयत्न करत होती. त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होती. पण नशेमुळे तिला ते जमत नव्हतं. विरेनला जायबंदी करताच एकजण धावत गाडी आणायला गेला. दुसर्‍याने वळून सन्वरीकडे बघितले. ती अजूनही त्याच धुंदावल्या नजरेने त्याला निरखत होती. तो तिच्या जवळ आला. तशी ती सावरत मागे सरकली. पायावर बसत त्याने तिच्या नजरेत नजर मिसळली….
काय होतं त्याच्या नजरेत दु:ख? वेदना?

त्याचे डोळे पाणावलेले होते. तिची अस्ताव्यस्त झालेली कपडे सावरायला त्याने हात पुढे केला तोच तिने त्याचा हात झिडकारुन लावला. तो काहीच बोलला नाही. आपल्या खिशात हात घालत त्याने एक वस्तू बाहेर काढली. तिचा डावा हात हातात घेतला. ती डोळ्यांत प्रश्नचिन्ह घेऊन त्याच्याकडे बघत होती. त्याची तिच्याशी नजरानजर होताच तो म्लान हसला. तिनं खस्सकन आपला हात ओढून घेतला. इतक्यात त्याला कोणीतरी मागून हाक मारली. पुन्हा एकदा हाक मारली तसा तो उठला. धावत मागे गेला. विरेनला त्याने गाडीत कोंबायला मदत केली.
“तिला अगोदर सोडूया!”
“काय? कुठे सोडूया? पत्ता तरी माहीत आहे का तिचा तुला”
“मग चल आपल्याबरोबर घेऊन जाऊ. आणि सकाळी परत..”
“अरे ए.. येडा झालायस का, तिला कुठे आपल्याबरोबर घेतोस?”
“अरे पण तिला एकटीला असं कसं सोडणार?”
“तिची हालत बघ. मदत करायला गेलास तर तुलाच आत घेऊन तुडवतील लोक!”
“मग काय इतक्या रात्री अशाच अवस्थेत सोडायचं तिला?”
“ठिक आहे, आण तिला- जाताना हॉटेलात सोडू”
तो तिच्याकडे यायला निघाला अन्-

“सन्वरी!!!!” जोरात ओरडत सोनीने कार तिच्यापासून कचकन ब्रेक मारत दोन पावलं पुढे थांबवली. रिद्धी गडबडीन दार उघडत तिच्या दिशेनं धावली-
“सन्वरी! ए सन्वरी- काय झालं? ए… आर यू ऑल राईट? हे बघ- इकडं बघ-” रिद्धी तिला शुद्धीवर आणू लागली. सन्वरी मात्र समोरच बघत होती. काही वेळानं रिद्धीचा परिचित आवाज तिच्या भण्ण मेंदूत शिरला अन तिनं आवाज देणार्‍या रिद्धीकडं निर्विकार नजरेनं बघितलं. पुन्हा ती समोर बघू लागली. तशी रिद्धीची नजरही त्या दिशेला गेली. आणि अंधारात एका फोर व्हीलर गाडीजवळ उभ्या असलेल्या दोन काळ्याकभिन्न आकृत्या तिच्या नजरेस पडल्या!
“ओ.. शिट्ट!!”
“वाटलंच होतं मला!.. चल-चल गाडीत बस लौकर” धावत गाडीत बसत एकजण बडबडला. दुसराही त्याच्या मागोमाग धावत गाडीत आला.

“ए.. थांब” मागून धावत रिद्धी किंचाळली. पण तोपर्यंत गाडी फुल्ल स्पिडनं तिथून निघून गेली होती.
“रिद्धी”
सोनीनं मागून आवाज दिला तशी रिद्धी पुन्हा सन्वरीकडे धावत आली. दोघींनी सन्वरीला धरुन कारमध्ये बसवलं. क्षणात कार कुलाब्याच्या दिशेनं धावायला लागली. या अवस्थेत सन्वरीला तिच्या घरी सोडणं योग्य नव्हतं. रिद्धीनं अस्वस्थपणे सिगरेटकेसमधून एक सिगरेट काढली. थरथरत्या हातांनी ती पेटवत, तिने भकाभका दोन-तिन कश मारले. नशा पार उडाली होती तिची. झालेल्या घटनांचा ती विचार करण्यात गढली होती. मधेच कधीतरी एकदा तिने मागच्या सीटकडे नजर वळवली. काहीच झालं नसल्यासारखी सन्वरी केव्हाच गाढ झोपून गेली होती!
“सोनू- गाडी सरळ माझ्या रुमवरच घे- रात्र खुप झालेय आणि तूपण आता माझ्याकडेच थांब” डोक्यामागे हात घेऊन सीटवर मागे रेलत रिद्धी सिगरेटचा कश घेत पुटपुटली…
=========0=========0=========0=========0=========0=========0=====

तड् तड् तड्..
बाहेर पावसाला सुरवात झाली होती. जो तो आपल्या कंबळांमध्ये उबारा घेत आरामात अंधरुणावर पडला होता. सगळी मुंबई गाढ झोपेच्या अधीन झाली होती. आणि त्याच वेळी तो मात्र मिठ-मिरचीच्या थंडगार पाण्याने अंघोळ घेत होता!
आगागा!
असल्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ? तिही तिखट-मिठाच्या! जीरली- पार जीरली त्याची. आयुष्यात कधी आता तो अंघोळीचं नाव घेणार नव्हता. अकराव्व्या वेळी बर्फाचं पाणी रप्पकन तोंडावर आलं आणि पार घायकूळतीला आला तो.
“ए बास.. बास रे” रडकुंडीला येत तो थरथरत उद्गरला. तशी क्षितिजने त्याच्या पुढ्यात खुर्ची ठेवली आणि त्यावर तो बसला.
“नाव काय तुझं?”
“विरेन”
पुन्हा- सप्प!
जीव तोडून किंचाळला तो. यावेळी थेट डोळ्यांतून मेंदवाकडे झिणझिण्या गेल्या होत्या!
“राहूल राहूल” किंचाळत तो बोलला.
“किती मुलींना फसवलंस?”
“….”
“आत्तापर्यंत किती मुलींना फसवलंस???” क्षितिजने आवाज चढवला.
“अं.. द- दहा एक असतील. पण नेटवरुन अशा चारच”
“कोणी विरोध केला नाही?”
त्यानं नकारार्थी मान डोलावली.
“त्यांना- आम्ही सरळ त्यांच्या क्लिप व्हायरल करु म्हणून धमकी देत होतो. त्यामुळे त्या मुकाट्याने आमचं बोलणं मान्य करत होत्या. आम्हाला काय करायची गरज नव्हती. मग जेवढा होईल तेवढा वापर करुन घ्यायचा!”
“आणि एखादी तयार झालीच नाही तर?”
“अशी वेळ खुप कमी आली. दोघींनी शहर सोडून दिलं. एकीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिचा नाद सोडावा लागला. आणि एकीनं आम्हालाच ओरडत दमदाटी करायला सुरवात केली म्हणून..”
“म्हणून?”
“म्-म्हणून प्रेमाचं नाटक करुन तिला.. तिला सरळ दोघांच्या खाली झोपायला भाग पाडलं!”

ऐकूनच क्षितिजच्या कपाळावरची शीर सण्णकन् सणकली. कराकरा दात चावत तो कपाळ चिमटीत पकडत तसाच राग आवरत खुर्चीवर मागे रेलला. त्याच वेळी अमरने फाडाफड एकापाठोपाठ एक- एकाच गालावर राहूलच्या कानाखाली जाळ काढला. त्यात त्याचा दात अर्धवट तुटला. नाकातोंडातून रक्ताची धार लागली. राहुल भेकांड पसरुन रडायला लागला. त्याकडे दुर्लक्ष करत क्षितिजने डोळे झाकलेल्या अवस्थेतच त्याला थंड सुरात प्रश्न विचारला-
“अजुन किती भडवे आहेत तुझ्याबरोबर?”
त्यानं आवंढा गिळत वर पाहिलं
“बोल!!” अमर चवताळून अंगावर आला तसा राहूल ढेपाळला-
“आ.. आम्ही दोघेच आहोत”
“पोरींना ब्लॅकमेल करुन काय दोघेच सौदा-सौदा खेळणार होतात काय रे?”
“त्..ते माझ्या मित्राच्या जोडीदाराने सांगितलं होतं असं करायला. तो त्याचे पैसेही देणार होता, फक्त एक-दोनदा तो तिला वापरुन घेणार होता. चांगले पैसे जमले की नंतर सोडणार होता”
“तो भडवा कुठं राहतो?”
“धोबीघाटला, पण घरी तो जास्त भेटत नाही बाहेरच भटकत असतो”
“नाव काय त्याचं?”
“सगळे सुलतान म्हणतात त्याला”
“अन तुझा मित्र कुठे राहतो?”
“तिथेच धोबीघाटच्या टोकाला”
“आत्ता कुठे भेटेल?”
“माहीत नाही”
“अं?” डोळे उघडत क्षितिजने राहूलकडे कटाक्ष टाकला आणि त्या पाशवी नजरेनेच राहूलच्या XX कपाळात गेल्या!
“त्- त्याला नवीन पोरगी भेटलेय- तिला घेऊन तो आज बांद्र्याला जाणार होता पार्टीला. तिथून मग सरळ तिला घेऊन हॉटेल ताराला!”
“तुझ्या मित्राचं नाव काय?”
“दिलबर- सध्या तो विरेन म्हणूनच असतो”
“हाच ना?”
मोबाईवरचा फोटो दाखवत क्षितिजने विचारलं
“अं.. हो”
“नंबर काय त्याचा?”
खिशातून एक चिटोरं काढत क्षितिजने- राहुल सांगत असलेला नंबर मॅच करुन बघितला. नंबर तोच आहे याची खात्री होताच ते चिटोर त्याने पुन्हा आपल्या खिशात सारलं.
“पार्टी कुठे आहे?”
“रॉयल्टी क्लब- बांद्रा!”

क्षितिज जाग्यावरुन उठला. अमरला त्याने फोरव्हीलर काढायला सांगितली. अमर धावत बाहेर गेला तसा क्षितिज पुन्हा राहूलकडे वळत म्हणाला-
“हा…. इंडस्ट्रीअल एरिया आहे. इथं- रात्रीचं काळं कुत्रपण फिरकत नाही. भुतं आहेत म्हणे इथं!
जास्त हुशारपणा केलास तर माझा माणूस याच जाग्यावर- तुझा कोथळा काढून पसार होईल. मग कितीपण बोंबलास तरी- सकाळपर्यंत इथं कोणी येण्याचं धाडस करणार नाही!”

डोळ्यांत साकळणार्‍या त्याच्या भितीकडे लक्षही न देता क्षितिज सरळ बाहेरच्या दिशेने चालायला लागला.
गाडीत बसताच अमरने क्षितिजकडे नजर टाकली-
“ह्म्म?”
“बांद्र्याला घे- रॉयल्टी क्लब. किती वेळ लागेल?”
“पंधरा मिनिटांत पोहोचू” घड्याळ डोळ्यांसमोर घेत क्षितिजने मान डोलावली.
“ठिक आहे”
“तिथेच उचलायचा?”
“नाही- याला रेडहँड पकडायचा, तोपर्यंत फक्त चेस करायचं”
अमरने गाडी स्टार्ट केली. रात्रीच्या लोकांच्या एक झोपा होत असतानाच अमरची गाडी मुंबईच्या काळ्याभोर रस्त्यांवरुन चर्र चर्र पाणी कापत तुफान वेगाने धावत होती… वर पावसाची रिमझीम केव्हाच थांबली होती..
=========0=========0=========0=========0=========0=========0=====

सोनीनं त्याच्याकडे पाहिलं अन फस्सकन तिच्या तोंडातून हसू बाहेर पडलं. रिद्धीचं लक्ष जाताच तिने चटकन तोंडाजवळ हात नेत खोकून दाखवलं. सौम्याने गप्पकन तोंडावर हात नेत मान वळवून घेतली. आणि एवढं सगळं होऊन सन्वरी मात्र आरामात टेबलावर पुढे झुकत- कंट्रोल गेल्यासारखी नुसतीच- केसांआड उचक्या देत गदगदत राहीली!

“ह्म.. शूक..!” तिच्या तशा हसण्याने डिस्टर्ब होत रिद्धीने उगाचंच तिला डोळे तिला वटारुन ‘नको’ म्हणून बजावलं. एवढ्यात सोनीनं सौम्याला जोरात कोपरखीळ मारुन संधी साधून घेतली-
‘गप ना जरा’
सौम्या तोंड दाबत काही क्षण, मान वळवलेल्या स्थितीत तशीच पडून राहिली. रिद्धीचं लक्ष हटताच तोंडावरचा हात काढून सोनीला टाळी देत ती सोनीबरोबर खळाळून हसू लागली. रिद्धीनं तिच्याकडे पाहताच मात्र ओठ आवळत ती अटेन्शनमध्ये गप्प बसली. पण मग रोखून बघणार्‍या रिद्धीलाच- ‘एकदा-एकदा- एकदाच हं’ म्हणून डोळ्यांनी विनवणी करु लागली. रिद्धी बघतेय आपली तिच्या वात्रटपणाकडे!
तिची परमिशन ग्राह्य धरुन सौम्याने लगेच बाजूला बसलेल्या सोनीला हळूच चावटपणे डिवचत डोळा मारला. पुन्हा फोन टेबलाच्या मधोमध घेत तिने पलिकडे बसलेल्या सन्वरीला ‘घे-घे, बघून घे- बघून घे’ म्हणून इशारा केला. व्हिडीओवरचा प्ले आयकॉन टच केला अन…

अक्षरश: वेड्यासारख्या हातपाय आदळत तिघी बांध फुटल्यासारख्या जोर-जोरात खिदळू लागल्या. ‘अव्वा’ म्हणत सोनीनं तोंडाचा आ वासत गप्पकन तोंडावर हात धरला. सोनी छातीवर हात ठेवत दम घेत खदखदत राहिली. ते बघून रिद्धी परिस्थितीचं गांभीर्य विसरुन फक्त एकदाच खुद्कन हसली. पण बाजूला लक्ष जाताच ती तोंडावर हात ठेवत चटकन गप्प बसली. इकडे सन्वरी आऊट ऑफ कंट्रोल होऊन नुसती अस्ताव्यस्त हसू लागली. आणि तेवढ्यात-

“स्टॉप इट यार!..” मध्येच खुदकत त्रिष्णा जोरात सर्वांवर ओरडली!
“सारखं काय तेच तेच बघताय?” म्हणताना तिलाही अगदी लाजल्यासारखं झालं. तशा पुन्हा सगळ्याजणी तिच्यावर हसायला लागल्या.

“पण सही झालं. त्या माकडाबरोबर हेच व्हायला हवं होतं” थोड्या वेळानं हसण्याचा बहर कमी होताच सोनीनं दम घेत आपलं मत व्यक्त केलं.
“भेटलं कुठं गं हे माकड तुला?” सन्वरी
“माकड? ए- सोंडवालं माकडं हं! हे बघ!” म्हणत सौम्याने तिला ती क्लिप दाखवली अन ती बघून पुन्हा सौम्याला चापट्या मारत सन्वरी किंचाळत हसू लागली. सौम्या न सोनी सुद्धा तिच्या सोबत मोठ्याने हसायला लागल्या!

“ए-ज्जाना!!! ए-रिद्धी बघ ना हे कसे करतायत ते!”
“सिरिअसली- हे भेटलं कुठं तुला?”
“एफबी वर! पण मला माहित नव्हतं हे असं नालायक निघेल ते” गाल फुगवत त्रिष्णा पुटपुटली.
“जाऊ दे, ब्याद टळली! पोलिसांनी पकडलाय त्याला सगळं काढतील बाहेर; पण रिद्धी तू कसं काय ओळखलंस याला”
“ओळखायचं काय त्यात- सन्वरी नऊ वाजले तरी हलायला तयार नाही. त्रिष्णाला फोन केला तर तिचीही तिच तर्‍हा. शेखर तर दिवसभर झोपाच काढत होता. त्यामुळे मला शंका आली. इतक्या वेळी आपण ड्रींक्स घेतली. हँगओव्हर झाला. पण असं कधी झालं नव्हतं, आजच का? मी सरळ डॉ. केतकरांना फोन करुन माझ्या रुमवरच बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं. हा ड्रींक्सचा नाही तर झोपेच्या औषधाचा- ओव्हरडोसचा परिणाम आहे!”
“गॉश्श!!” डोळे विस्फारत सौम्या पुटपुटली.
“सन्वरी शुद्धीवर येताच मी तिला अगोदर छेड काढणार्‍या टोळक्याबद्दल विचारलं, तर म्हणे- ‘आमच्या मागे टोळकं लागलं होतं हेच मला माहीत नाही! छेडायची गोष्ट लांबच’ मग मात्र विरेनचा खोटेपणा माझ्या लक्षात यायला लागला. त्या रात्रीची एक-एक गोष्ट मला स्ट्राईक होत गेली.

तरीही खात्री म्हणून मी इकडून दिग्विजय सरांना फोन केला. त्यांनी बांद्रा पोलीसांना फोन करुन माहिती दिली. त्या पोलिसांनी लगेच क्लबच्या एक-एक बार टेंडरची कसून चौकशी केली. पण त्यांच्यापैकी कोणीही ते औषध मिसळलेलं नव्हतं. म्हणजे इथूनपण फिरुन आलं कोणाकडे? विरेनकडेच! कारण तोच काय तो आपल्यात नवीन होता. दुसरं म्हणजे- आपल्यातलं कोणी- मस्करीमध्येही असं काही करणार नव्हतं!”
“माय गॉड! पण काय डोकं लावलं होतं गं त्यानं?” सोनी डोक्याला हात लावत उद्गरली
“हो ना, आणि सगळ्यात जास्त धोका होता माझ्यापासून, म्हणून मला त्यानं अगोदर ड्रींक मध्ये जास्त औषध टाकून दिलं. पण त्याचं बॅडलक! नेमके त्यावेळी शेखरने ड्रींक्स घ्यायची इच्छा व्यक्त केली आणि मी ते ड्रींक्स शेखरला पास ऑन केलं. जर मी ते घेतल असतं तर आजचा फुल डे उठू शकले नसते!”

“हो बरोबर आहे. माझ्यावेळीपण त्यानं तसंच केलं. मला दिलेलं ड्रींक्स मी त्रिष्णाला दिलं म्हणून त्याने परत माझ्यासाठी स्पेशल ड्रींक्स आणलं” सन्वरी आठवत म्हणाली.
“त्यामुळेच तुम्हा दोघींनाही औषधाचा एकच डोस मिळाला होता”
“आय एम शुअर, फाऊंटन-इन्नच्या जवळ त्यानेच तुझे कपडे फाडून देखावा निर्माण केला असणार!”
“नालायक!” आठवणीनेच सन्वरीचा जळफळाट झाला

“अगं पण मग- यांची अशी हालत कोणी केली? आणि अंधारात- आपल्याला बघून पळून गेलेला, तो कोण होता?” सोनी
“त्याचं काही समजलं नाही, पण मी दिग्विजय सरांकडून माहिती घेत असताना हे दोघे बिना कपड्याचे फ्लोरा फाऊंटनच्या चौकात येऊन पडले होते. मला वाटतं त्यांची इज्जत घालवण्याकरताच त्यांची सगळी कपडे काढून त्यांना तिथं भर चौकात असं मोकळं सोडलेलं असणार! नाहीतर फक्त बदडून पोलीसांकडे नसतं का दिलं?”
“ह्म्म”
“ए पण, ट्रीक मस्त केली हा त्यांनी!- मागे हात बांधल्याने पुढचं झाकता येत नाही आणि पाय बांधल्याने सरळ पळताही येत नाही” सौम्या
“हो ना- नुसतंच आपलं उड्या मारत, ठुचूक-ठुचूक” सोनी हाताची अ‍ॅक्शन करत अशी काही बोलली की सगळ्या जणींमध्ये पुन्हा एकदा हास्याची लाट उसळली. त्रिष्णा तर ठसका लागेपर्यंत हसत राहीली.

मध्येच हसताना सन्वरीचं लक्ष आपल्या डाव्या हाताकडे गेलं..
अंगठ्याजवळच्या बोटात तिची हिरेजडीत अंगठी चमकत होती… तिच ती- तिने टपरीवाल्याला देऊन टाकलेली तिची एस इनिशीअल्सची अंगठी!
“…आणि अंधारात आपल्याला बघून पळालेला तो कोण होता?”…..
सोनीचा प्रश्न तिच्या कानात घुमला
सन्वरीनं अंगठी गच्च आवळून हातात धरली.. तो कोण होता ते तिला कदाचित माहित होतं..
कदाचित..!

क्रमश:
=========0=========0=========0=========0=========0=========0=====
भाग=>> 15

मुखपृष्ठ

About annu2

i m very sensitive but free minded person

Posted on August 27, 2019, in कथा, थ्रिलर, मराठी कथा, सस्पेंन्स. Bookmark the permalink. 12 Comments.

  1. दत्ता उतेकर

    तुमची नोटिफिकेशन आली आणि लगेच भाग वाचून काढला..

    लिंक लागायला थोडा वेळ गेला पण… जसं जसं भाग पुढे वाचत राहिलो तसं तसं समजत राहिलं… खूप मस्त भाग होता हा… मजा आली वाचून.. पुढे काय होणार आहे ह्याची उत्सुकता तर आहेच… खूप प्रश्न उलगडायचे अजूनही बाकी आहेत… कदाचित पुढे त्याचा खुलासा होईल…👌👌

    एक विनंती करतो की आता प्लिज कादंबरी / कथा पूर्ण होईस्तोवर प्लिज अपडेट देत राहा..

    यूअर्स,
    दत्ता उतेकर

  2. दत्ता उतेकर

    डिअर लेखक,

    पुढील भागाच्या प्रतीक्षेत चातकासारखी वाट पाहत आहोत.

    यूअर्स,
    दत्ता उतेकर

  3. दत्ता उतेकर

    प्रिय लेखक / लेखिकाजी,

    पुढचा भाग केव्हा येणार आहे.. प्लिज लवकरात लवकर पुढचा भाग द्यावा ही नम्र विनंती..🙏🙏

  4. Ha part hi khupch interesting hota plz next part lvkr post kra.

  5. Please nest part…

  6. दत्ता उतेकर

    Waiting for next dharmala..☺️☺️

  7. Please post the final part.

Leave a comment